शाळा माणवी जीवनाचा पाया सध्याच्या युगात माणवि जीवनतील एक महत्वाचा घटक.
शाळा म्हणजे फ़क्त ४ भिंती नसुन एक अनंत चैतन्य असते प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पुरे करणारे मंदिर म्हणजे शाळा.
शाळा म्हणजे असे ठिकाण कि जिथे व्यक्ती आपल्या जिवनाची सुरुवात करते बालपनाकडुन तारुण्याकडे जाताना जिवनाकडे बघन्याचा द्रुष्टिकोन माणुस आपल्या शाळेतच शिकतो.
माणुस अनेक सक्तिची नाती जन्माला येताना घेउन येतो मात्र शाळेत तो स्वखुशीने नविन नाती जोडतो.
अनेक धडे आपण शाळेत शिकलो .. विसरलो देखिल,
परंतु मैत्रीच्या धड्याची सुरुवात मात्र बहुतेक जणांनी शाळेतच केली असावी.
हा धडा सगळेजन जन्मभर लक्षातही ठेवतात आणि तसे आचरणही करतात.
शाळेत जाउन व्यक्ती फ़क्त अभ्यासच करते असे नाही तर आपल्या मनात जिवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो,
प्रत्येकाला आपल्या कलागुनांना वाव देण्याची संधी मिळते.
कोणी अभ्यासात ,कोणी चित्रकलेत ,कोणी खेळात,कोणी गान्यात ,कोणी सहित्यात,कोणी नाट्यक्षेत्रात प्राविण्य मिळवतो / परितोषिक मिळवतो आपल्या कलागुनांना वाव देतो.
विचार केला तर प्रत्येक जण कुटुंबाएवढाच शाळेशी एकरुप होतो शाळेत वेळ घालवतो.
मात्र एकदा शिक्षण पुर्ण झाले कि बाहेरच्या विश्वात भरारी मारण्यासाठी सज्ज,
होतो परंतु हि भरारी मारण्यासाठी आपल्या पंखांना बळ मिळते ते शाळेतच!!!
एकदा शाळेतुन बाहेर पडलो कि बाहेरच्या विश्वाशी आपण समरस हॊउ लागतो हळु हळु शाळेशी संपर्क तुटु लागतो...
प्रत्येकजण विविध क्षेत्रात झेपावतो, मोठा होतो.
परंतु आपली शाळा/ माझी शाळा -- शाळेतले ते सोनेरी दिवस ..
हा प्रत्येकासाठी तसा जिव्हाळ्याचा विषय.
आपल्या शाळेबद्दल प्रत्येकाच्या मनात एक विषेश जागा असते.
प्रत्येकाला आपली शाळा हवी असते, आपल्या शाळेसाठी काहितरी करावेसे वाटते पण अनेक मित्रांशी संपर्क तुटलेला असतो ...
आपल्या जुन्या मित्रांना भेटावे असे प्रत्येकालाच वाटते...
परंतु जमत मात्र नाही.
आपली शाळा मोठी व्हावी ती जगाच्या नकाशात दिसावी तसेच आपण ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत असे प्रत्येकाला अभिमानाने सांगावे असे प्रत्येकालाच वाटते ना?
म्हणुनच आपल्या अरण्येश्वर शिक्षण संस्थेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आनन्याचा हा प्रमाणिक प्रयत्न..
आपण ह्या समाजाचे काहितरी देने लागतो... आपल्या शाळेसाठी , समाजासाठी आपणही काही तरी करु शकतो...
तर मग चला आपल्या शाळेसाठी ह्या समाजासाठी काहितरी करुया...आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातुन..
माजी विद्यर्थी संघाच्या माध्यमातुन आपण खुप काहि करु शकतो जसे
जुन्या आठवनिंना उजाळा
गरीब व गरजु विद्यर्थ्यांना मदत, प्रोत्साहन , मार्गदर्शन.
आणखी बरेच काही.
तर मग चला ह्या संघाचा घटक बना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
best ....and i owe to do this
Post a Comment