अरण्येश्वर शिक्षण संस्था माजी विद्यार्थी संघातर्फे दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी Career Guidance हे मार्गदर्शन शिबिर दि. १३/१२/२००८ रोजी आयोजीत केले होते. माजी विद्यार्थी संघाच्या स्थापने नंतर हा पहिलाच कार्यक्रम.
अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी संगणक, मेडिकल, फ़ायनांस, वाणिज्य, बँकिंग, शिक्षण, एअर होस्टेज ,कला, आर्किटेक्ट, पोलीस ,विज्ञान , पत्रकारीता तसेच इतर अनेक क्षेत्रातील संधी व पात्रता यांची माहीती करुन दिली.
सुमारे १६० दहाविच्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
संजय भुजबळ, गणेश काळे, मनिष कलबुर्गी,शिवशांत भंडारे, अभिजीत मोरे, प्रशांत पवार, रश्मी शानबाग , शॆलेश काळे तसेच वर्गशिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी दहाविच्या विद्यार्थ्यांला विशेष मार्गदर्शन केले.
अरण्येश्वर शिक्षण संस्था माजी विद्यार्थी संघ असेच अनेक कार्यक्रम चालु व नविन वर्षात आयोजीत करनार आहे.
आपला हा माजी विद्यार्थी संघ आपन असाच वाढवु.
जास्तित जास्त माजी विद्यार्थ्यांनी ह्या संघाचे सभासद होवुन सामाजीक कार्यात आपला सहभाग वाढवावा ही विनंती.
No comments:
Post a Comment