

अरण्येश्वर माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने इयत्ता १० वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांसाठी "करिअर मार्गदर्शन" कार्यक्रमाचे आयोजन ३० जानेवारी २०१० रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थांना आणि पालकांना दहावीनंतर विविध क्षेत्रातील संधी आणि विविध शैक्षणिक पर्याय तसेच विविध शैक्षणिक संस्था यांविषयी स्लाईड शो आणि चित्रफितींच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. या प्रसंगी पोलीस दल आणि प्रशासकीय सेवाविविध संधी,स्पर्धा परीक्षा,पात्रता यांविषयी राज्य गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त मा. श्री. संजय जाधव आणि शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. संग्रामसिंह निशाणदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अरण्येश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल कुलकर्णी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया पुजारी, डॉ. भावना जोशी, माजी मुख्याध्यापिका विभावरी देशपांडे याप्रसंगी उपस्थित होत्या. माजी विद्यार्थी संघाचे गणेश काळे, संजय भुजबळ, मनिष कलबुर्गी, शैलेश काळे,शिवशांत भंडारे यांनी ह्यावेळी विद्यार्थी व पालकांना विविध क्षेत्रातील संधी आणि विविध शैक्षणिक पर्याय यांची माहिती दिली.